HCG Care App: कर्करोगग्रस्त रूग्‍णांसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार आणि औषधे होणार उपलब्‍ध

हेल्‍थकेअर ग्‍लोबल एंटरप्राइजेज लि. या हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या कॅन्‍सर केअर नेटवर्कने ऑन्‍कोलॉजी केअर स्‍पेसमधील अद्वितीय एचसीजी केअर अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप कर्करोगाने पीडित रूग्‍णांना जेथे असतील तेथे (किंवा चालता-फिरता) तज्ज्ञ, वैयक्तिकृत कॅन्‍सर केअर सेवा सुलभपणे, सतत व सक्रियपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

एचसीजी केअर अॅप एका एकीकृत डॅशबोर्डवर कॅन्‍सर केअरमधील सर्वसमावेशक डिजिटलाइज्‍ड सेवा प्रदान करते. हे अॅप कर्करोगाने पीडित रूग्‍णांना डॉक्‍टर अपॉइण्‍टमेंट्स बुक करण्‍यासाठी एचसीजी नेटवर्कमधील त्‍यांच्‍या पसंतीचे कोणतेही हॉस्पिटल किंवा डे केअर सेंटर निवडण्‍याची सुविधा देते. ते आणि त्‍यांचे काळजी घेणारे कुटुंबिय त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सवरून व्हिडिओ कॉलच्‍या माध्‍यमातून व्‍हर्च्‍युअली वैद्यकीय रिपोर्टस् शेअर करू शकतात, ऑन्‍कोलॉजिस्‍ट्ससोबत सल्‍लामसलत व परस्‍परसंवाद करू शकतात. हे अॅप त्यांना एचसीजी डेटा रजिस्‍ट्रीमधून त्‍यांच्‍या वैद्यकीय नोंदी मिळवण्‍यास सक्षम करते. नवीन व विद्यमान एचसीजी रूग्‍ण सानुकूल उपचार योजनांबाबत जाणून घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या सोयीसुविधेनुसार उपचार घेता येतात. या अॅपच्‍या माध्‍यमातून ते औषधे खरेदी करू शकतात, तज्ज्ञांचा सल्‍ला घेऊ शकतात आणि समुपदेशन घेऊ शकतात, तसेच पोषण व आहारसरादर्भात सल्‍ला घेऊ शकतात आणि होम हेल्‍थ सर्विसेस् व पुनर्वसन केअर बुक करू शकतात.

याव्‍यतिरिक्‍त, प्लॅटफॉर्म एचसीजी येथील डॉक्‍टर व वैद्यकीय टीम्‍सना रूग्‍णांच्‍या नोंदी एकत्रित करण्‍यास आणि सुधारित केअर सुविधांसाठी वैयक्तिक वैद्यकीय रिपोर्टसचा प्रसार व विश्‍लेषण करण्‍यास सक्षम करते. हे अॅप एचसीजीच्‍या डॉक्‍टरांना माहितीपूर्ण निर्णय घेण्‍यासाठी आणि उपचार प्रोटोकॉल सानुकूल करण्‍यासाठी प्रगत डेटा अॅनालिटिक्‍सचा फायदा घेण्‍यामध्‍ये साह्य करते, ज्‍यामुळे सर्वोत्तम निष्‍पत्ती संपादित करण्‍यासाठी हेल्‍थकेअर वितरणामध्‍ये क्रांतिकारी बदल घडून येत आहे. एचसीजी केअर अॅप गुगल प्‍ले स्‍टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येऊ शकते आणि आयओएस व अँड्रॉईड फोन्‍ससाठी उपलब्‍ध आहे.

हेल्‍थकेअर ग्‍लोबल एंटरप्राइजेज लि. चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राज गोरे म्‍हणाले, ‘समर्पित एचसीजी केअर अॅपच्‍या माध्‍यमातून आमच्‍या डॉक्‍टर, समुपदेशक, न्‍यूट्रिशनिस्‍ट्स, आहारतज्ज्ञ, क्लिनिशियन्‍स व फार्मासिस्‍ट्सच्‍या टीम्‍स सर्वोत्तम कॅन्‍सर केअर व मार्गदर्शनाचा शोध घेत असलेल्‍या रूग्‍णांना सर्वोत्तम सेवा देतात. आम्‍हाला माहित आहे की, कर्करोगाने पीडित रूग्‍णांना व त्‍यांच्‍या कुटुंबियांना उपचार प्रक्रियेदरम्‍यान तणावाचा सामना करावा लागतो. त्‍यांना सहानुभूतीशील सोबतीची गरज असते, जो त्‍यांची या काळादरम्‍यान काळजी घेईल. हे डिजिटल इनोव्‍हेशन कर्करोगासंदर्भात सतत घ्‍यावी लागणारी केअर प्रक्रिया सुलभ करते, ज्‍यामधून कर्करोगाने पीडित रूग्‍णांच्‍या व कॅन्‍सर सर्व्‍हायवर्सच्‍या उपचार प्रक्रियेदरम्‍यान सतत वैयक्तिकृत कॅन्‍सर केअर व पाठिंबा देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. एचसीजीची खासियत आरोग्‍यसेवा सर्वोत्तमता आणि उच्‍च दर्जाचे उपचार निष्‍पत्ती संपादित करण्‍यामध्ये सामावलेली आहे. एचसीजी प्रगत जागतिक कॅन्‍सर केअर प्रोटोकॉल्‍सना प्रतिसाद देण्‍यासाठी सतत नाविन्यता आणण्‍यासह विकसित होत असताना आमचा रूग्‍णांना वैयक्तिक आरामदायीपणा देण्‍याचा प्रयत्‍न आहे.’

एचसीजी केअर अॅप डिजिटल हेल्‍थकेअर परिवर्तन संपादित करण्‍यासाठी एचसीजी आणि टेक लीडर्स पीडब्‍ल्‍यूसी, सेल्‍सफोर्स एअॅन्‍डएम, क्‍लॉडार्क व टीसीएस यांच्‍यामधील सहयोगाने डिझाइन करण्‍यात आले आहे. कर्करोगाने पीडित रूग्‍णांची काळजी घेण्‍याची प्रक्रिया सुलभ करत आणि एचसीजीचे कॅन्‍सर स्‍पेशालिस्‍ट्स व रूग्‍णांमधील संवाद माध्‍यमांमध्‍ये वाढ करत हे अॅप आरोग्‍यसेवा टीम्‍ससाठी एकसंधी कार्यसंचालनांची खात्री देते.