अदानीची जर्मनीतील वायरकार्ड घोटाळय़ाशी तुलना

सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतरही अदानी समूहाची पाठ हिंडेनबर्ग संस्थेने सोडलेली नाही. आमचे नाव आणि पत खराब करण्यासाठी जुने आणि तेच ते बिनबुडाचे आरोप करण्याचे ब्रिटनस्थित फिनॅन्शियल टाईम्सकडून (एफटी) नव्याने प्रयत्न होत असल्याची ओरड अदानी समूहाने केल्यानंतर, याआधीही वायरकार्ड समूहाने याच प्रकारचे आरोप एफटीवर केले होते आणि नंतर हा उद्योग म्हणजे जर्मनीतला आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सिद्ध झाले होते, अशी आठवण हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नेट अँडरसन यांनी एक्सवरील ट्विटद्वारे करून दिली आहे. अदानी समूहाने समभागांच्या किमतीत गडबड केल्याचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेच्या एका अहवालामुळे, जानेवारी 2022 मध्ये, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. या अहवालामुळे अदानी ग्रुप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.