अदानी समूहाचा 5 अब्ज डॉलरचा कोळसा घोटाळा, हिंडनबर्ग संस्थेचा नवा आरोप

adani-group

अदानी समूहाचे उद्योग उजेडात आणणाऱ्या फिनॅन्शियल टाईम्सच्या पत्रकारांनी, अदानी समूहाने अब्जावधी डॉलरचा कोळसा दामदुप्पट भाव वाढवून आयात केल्याचे वृत्त दिले आहे.

हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये या वृत्ताची लिंक देण्यात आली आहे. 2021 पासून अशा कोळसा आयातीत सुमारे 5 अब्ज डॉलरचा घोटाळा करण्यात आला असल्याचे हिंदुस्थानी कस्टम्स विभागाच्या कागदपत्रांवरून दिसून येते, असे या पत्रकारांनी म्हटले आहे. बनावट बिले आणि विदेशी पंपन्यांची नावे वापरून आयात कोळशाच्या किमती फुगवण्यात आल्या आणि लाखो ग्राहकांच्या माथी या कोळशातून निर्माण झालेली वीज अव्वाच्या सव्वा दराने मारण्यात आली, असे या पत्रकारांनी म्हटले आहे. हिंदुस्थानातील सर्वात मोठे खासगी कोळसा आयातदार असलेल्या अदानी समूहाने अशा प्रकारे कोळशाची किंमत फुगवल्यामुळे लाखो हिंदुस्थानी ग्राहक आणि उद्योगांना विजेसाठी अधिक पैसे मोजावे लागले.

अदानी समूहाने कोणताही गैरव्यवहार केल्याचा इन्कार केला असून, हे वृत्त म्हणजे जुनेच आणि निराधार आरोप असल्याचे म्हटले आहे.