6 ऑगस्टला निष्ठावंत महिला शिवसैनिकांचा सन्मान

महाड, पोलादपूर, माणगाव तसेच श्रीवर्धन विधानसभेमधील निष्ठावंत ज्येष्ठ महिला शिवसैनिकांचा सन्मान सोहळा रविवार, 6 ऑगस्टला तरुण विकास मंडळ, अल्ताफ नगर गोळीबार रोड, घाटकोपर येथे होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी शिवसैनिक महिला मेळावा, महिला कार्यकर्त्यांसाठी लकी ड्रॉ कूपन योजनादेखील राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शिवसेना नेते हनुमंत जगताप, महाड-पोलादपूर विधानसभेच्या स्नेहल जगताप, ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील, दक्षिण-मध्य मुंबई विभागप्रमुख प्रमोद शिंदे, युवासेना दक्षिण रायगड प्रमुख सुनील ढाणे, महिला विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, पद्मावती शिंदे उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्याला महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, पनवेल, डोंबिवली, वसई, नालासोपारा, नवी  मुंबई, कल्याण, ठाणे येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, सहसंपर्कप्रमुख स्वाती दबडे यांनी केले आहे.