IPL 2024- मुंबईने परंपरा राखली, पहिला सामना गमावला

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स या संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

मुंबईने गेल्या 11 वर्षापासून पहिला सामना देवाला देण्याची परंपरा यंदाही कायम राखली. आयपीएलमध्ये मुंबई 2013 पासून कायम पहिला सामना गमावत आली आहे. यंदा कर्णधार बदलूनही या परंपरेत खंड पडला नाही.

मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सने चांगली फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला169 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. मुंबईचाी सलामीचा फलंदाज इशान किशन हा शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने एकाच षटकात 19 धावांची लूट केली पण त्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि रोहित शर्मा ने मुंबईचा डाव उचलून धरला आणि त्यांनी संघाची धावसंख्या 100 पार नेली. रोहितने 29 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविस४६ धावा केल्या. . गुजरातने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला.