जपान विकणार लढाऊ विमान

जपान देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जपानने आपल्या शांततेचा सिद्धांताला मुठमाती देत लढाऊ विमान विकण्याचा निर्णय घेतला आहे. जपान आपले लढाऊ जेट विमान ब्रिटन आणि इटली यांच्यासोबत अन्य देशांत विकसित करत आहे. जपान संयुक्त लढाऊ जेट परियोजनेत लढाऊ विमान विकण्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. जपानच्या कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा यावर निर्णय घेण्यात आला आहे. लढाऊ विमानासोबत प्राणघातक शस्त्रांना अन्य देशांत विकण्याची परवानगी मिळणार आहे.