दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त चमचाभर खा ‘हा’ पदार्थ, शरीराला होतील जबरदस्त फायदे

आयुर्वेदात तुपाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ‘तूप खाल्ल्याने रूप येते’, या उक्तीप्रमाणे तुपाचे सेवन नियमित आरोग्य आणि सौंदर्य उत्तम राखले जाते. रोज सकाळी रिकाम्यापोटी तूप खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.

आपल्याकडे तुपाचे सेवन करण्याची परंपरा आहे. अन्नपदार्थ शिजवताना, आहारात, औषधात किंवा सौंदर्यवाढीसाठी तुपाचा वापर केला जातो. तुपात कॅलरी, गुड फॅट, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट यासह अनेक पोषक तत्त्वे असतात. तुपातील पौष्टिक घटकांचा फायदा होण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी फक्त चमचाभर तूप खाण्याचा सल्ला दिला जातो.

रिकाम्या पोटी तुपाचे सेवन पचनसंस्था निरोगी राहते. सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचन विकारांचा धोका टळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

आयुर्वेदानुसार, तुपात लुब्रिकेंट प्रॉपर्टिज असतात. त्यामुळे सांधे मजबूत राहतात. दररोज रिकाम्या पोटी चमचाभर तुपाचे सेवन केल्याने सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकते.

तूप कॅलरी आणि हेल्दी फॅटचा उत्तम स्त्रोत आहे. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ऊर्जा टिकून राहण्यासही मदत होते.

– तुपात थोडेसे मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने कोरडा खोकल्याच्या समस्येवर आराम मिळतो. तूप घशात लुब्रिकेशनचे काम करते.

– तुपाचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी केल्याने शरीराला जीवनसत्त्व ए, डी, ई आणि क अशी खास पोषक तत्त्वेही मिळतात. शरीरात ही सर्व पोषक द्रव्ये शोषून घेतली जातात.

– मेंदूच्या आरोग्यासाठी तूप अत्यंत गुणकारी समजले जाते. यामुळे मेंदूला पोषण मिळते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी तूप गुणकारी मानले जाते.

– तुपात हेल्दी फॅट असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते. त्वचा तुकतुकीत, मुलायम होण्यासाठीही तूप खाल्ल्ल्याने फायदा होतो. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.