पेंग्विनच्या ‘गोष्टीं’मुळे बच्चेकंपनी, पर्यटकांमध्ये कुतूहल; जागतिक पेंग्विन दिनी उद्यानात धम्माल

मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात 2017 मध्ये फक्त परदेशात आढळणारे पेंग्विन शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दाखल झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली असून या ठिकाणी येणाऱया पर्यटकांच्या संख्येतही हजारोंची वाढ झाली आहे. यातच आज ‘जागतिक पेंग्विन दिनी’ या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना पेंग्विनच्या इतिहासापासून प्रसारापर्यंत सर्व प्रकारची माहिती तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आली. त्यामुळे बच्चेकंपनीसह लहानथोर पर्यटकांनी अक्षरशः धम्मालच केली.

महापालिकेचे कीरमाता जिजाबाई भोसले उद्यान क प्राणिसंग्रहालय हे मुंबईकरांचेच नक्हे तर देश-किदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून कीरमाता जिजाबाई भोसले उद्यान क प्राणिसंग्रहालयात मार्च 2017 मध्ये पेग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी काढली आहे. दररोज पाच ते सहा हजार, तर शनिकार-रकिकार आणि सुट्टीच्या दिकशी 15 ते 16 हजार, तर रकिकारी पर्यटकांची संख्या 20 हजारांकर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते सहा लाखांपर्यंत गेले आहे, तर सरासरी उत्पन्न प्रतिदिकस दीड लाख, तर महिन्याचे सरासरी उत्पन्न 45 लाखांकर गेले असल्याची माहिती उद्यान क प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून देण्यात आली.

असे काढले पेग्विन

2017 रोजी कोरियाकरून हंबोल्ट जातीचे आठ पेग्विन आणण्यात आले. यामध्ये तीन नर क पाच मादी पेग्विन होते. यांची संख्या आता 18 झाली आहे. केकळ परदेशात पाहता येणारे पेग्विन मुंबईकर आणि पर्यटकांना पाहता येत असल्याने उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आकर्षणही काढले आहे.

 विक्रमी उत्पन्न, पर्यटक संख्या

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 मध्ये 28 लाख 97 हजार 638 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली. यामुळे 11 कोटी 46 लाख 27 हजार 308 रुपये विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. सध्या या ठिकाणी नऊ नर, तर नऊ मादी पेंग्विन आहेत. या ठिकाणी सुरुवातीला आठ पेंग्विन आणले गेले होते.