तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी का ? शरीर देते ‘हे’ संकेत; वाचा सविस्तर

नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

कॅनडा येथे राहणाऱ्या एका महिलेची आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या महिलेच्या शरीरात सोडियमची कमतरता म्हणजेच हायपोनेट्रेमिया या विकाराने ग्रस्त आहे. जर त्वरित या महिलेवर उपचार केले नसते, तर तिचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भरपूर पाणी प्यायला हवे. यामुळे शरीर डिहायड्रेट व्हायला मदत होते. असे असले तरी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानेही शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने डोकेदुखी, थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त पाणी प्यायल्याने व्यक्ती कोमातही जाऊ शकते. यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.

निरोगी व्यक्तिने एका दिवसांत किती पाणी प्यावे?
निरोगी व्यक्तिने एका दिवसांत किती पाणी प्यावे, याविषयी कोणतेही प्रमाण निश्चित नाही.
बहुतांश डॉक्टर निरोगी व्यक्तिंना दररोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. दिवसभरात किती पाणी प्यायला हवेसाला किती पाणी प्यायला हवे हे वातावरण, व्यायाम, गर्भधारणा आणि स्तनपान यासारख्या घटकांवरदेखील अवलंबून असते.

जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर होणारा परिणाम ?
– आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास अन्नातून विषबाधा झाल्यासारखी विषबाधा होऊ शकते. त्यामुळे मेंदू नीट काम करत नाही. याचे कारण जेव्हा आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये जास्त पाणी असते तेव्हा त्या फुगतात. त्यामुळे मेंदूवर दाब निर्माण होतो. अशा वेळी व्यक्तीचे डोके दुखू लागते. एकाग्रता भंग होते. जेव्हा दाब वाढतो तेव्हा एखाद्या व्यक्तिला उच्च रक्तदाब आणि ह्रदयाची गती कमी झाल्याची समस्या उद्भवू शकते.

-शरीरात जास्त पाणी असल्यास सोडियमची कमतरता उद्भवते. यामुळे हायपोनेट्रेमियाची सोडियम हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. जो द्रव पदार्थांचे संतुलन राखतो. जेव्हा त्याची पातळी कमी होते, तेव्हा पेशींमध्ये जळजळ होते. यामुळे व्यक्ती कोमात जाऊ शकतो किंवा व्यक्तिचा मृत्यू होऊ शकतो.

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिता, हे कसे ओळखाल?

लघवीचा रंग
आपण जास्त पाणी पित आहोत की, नाही हे शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लघवीचा रंग. जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल, तर याचा अर्थ तुम्ही कमी पित आहात तसेच जर लघवीला कोणताच रंग नसेल, कमी वेळेत तुम्ही जास्त पाणी पित आहात, असे समजावे.

वारंवार बाथरूमला जाणे
नेहमीपेक्षा जास्त वेळा बाथरूममध्ये जात असाल, तर तुम्ही जास्त पाणी पित आहात, असे समजावे. जर तुम्ही दिवसभरात 6 ते 8 वेळा बाथरूमला जाणे, हे सामान्य लक्षण समजले जाते. जे लोक जास्त कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन करतात, ते सामान्यत: दिवसभरात 10 वेळा बाथरूमला जातात. हे सामान्य लक्षण मानले जाते.

तहान नसतानाही पाणी पिणे
तहान लागली नाही, तरी पुन्हा पुन्हा पाणी पिणे, हा जास्त पाणी पिण्याचा संकेत आहे. हे टाळण्यासाठी जेव्हा तुम्हाला जास्त तहान लागेल, तेव्हाच पाणी प्या.

मळमळणे आणि उलटीसारखे वाटणे
जेव्हा आपण जास्त प्रमाणात पाणी पितो तेव्हा किडनीवर दाब येतो. यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर येत नाही. त्यामुळे शरीरात द्रव पदार्थ जमा झाल्याने उलटी आणि मळमळणे, डायरिया यासारख्या समस्या उद्भवतात आणि दिवसभर थकवा आल्यासारखे वाटते.

डोकेदुखी, स्नायू कमकुवत होणे
शरीरात सोडियमचे प्रमाण कमी झाले की, मेंदूचे स्नायू फुगतात आणि मेंदूवर दाब येतो. त्यामुळे डोके दुखू लागते. यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील सोडियमच्या कमतरतेमुळे मांसपेशी कमजोर होतात.

हात, पाय आणि ओठांचा रंग बदलतो
जर तुम्ही जास्त पाणी पित असाल; तर हात, पाय आणि ओठांचा रंग किंचितसा बदलला आहे. हाता-पायांना सूज येणे. शरीराच्या पेशींमध्ये जळजळ होते तेव्हा त्वचेलादेखील सूजते.