Lok Sabha Election 2024 : डॉ.सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी! निलेश लंकेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काही ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. अशातच पाथर्डी तालुक्यामध्ये निलेश लंके यांच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंके यांचा प्रचार का करतो अस म्हणत सचिन हांडे यांना जबर मारहाण केली आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांच्या अंगरक्षकाने लंके यांच्या एका कार्यकर्त्याला जनसंवाद यात्रेत सहभागी झाला म्हणून मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे. त्यामुळे विखे कुटुंबीयांवर जोरदार टीका केली जात आहे.

सचिन नारायण हांडे असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मारहाणीनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली. सदर घटना 18 एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. सचिन हांडे हे राघुहिवरे ग्रामपंचायती समोर उभे असताना जबर ज्ञानदेव कुऱ्हे, गोरख शंकर लबडे व दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. निलेश लंके यांचा प्रचार का करतो अशी विचारणा करत हांडे यांना त्यांनी शिविगाळ केली. तसेच सुजय विखे यांचा प्रचार कर अशी धमकी त्यांनी हांडे यांना दिली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर हांडे यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर ब्लेडने वार केले. तसेच त्यांनी हांडे यांच्याकडील नऊ हजार रुपयांची रोकड चोरली

काही दिवसांपूर्वी डॉ.सुजय विखे यांचा अंगरक्षक गौरव सुधाकर गर्जे याने निलेश लंके यांचा कार्यकर्ता शहादेव पालवे यांना बेदम मारहाण केली होती. शहादेव हे नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेत सहभागी झाले होते. याच रागातून गौरव गर्जे याने शहादेव यांना सहकाऱ्यांच्या मदतीने जबर मारहाण केली होती.

चक्क ‘यमराज’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात; रेडय़ावरून येऊन भरला उमेदवारी अर्ज

पाथर्डीमध्ये निलेश लंके यांच्या समर्थकांना लागोपाठ दोनदा मारहाण झाली. त्यामुळे निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ”सत्ता तुमच्याकडे असून याच सत्तेच्या जोरावर आणि तुमच्या पाठबळावर तुमचे कार्यकर्ते आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करत आहेत. मतदार मतपेटीतून त्याचे चोख उत्तर देतील, अशा इशारा यावेळी निलेश लंके यांच्या समर्थकांनी दिला.