लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात! चंद्रपुरात लोकप्रतिनिधींचा पहिला नंबर, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन

Lok Sabha Election 2024 : चा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला शुक्रवारी सुरुवात झाली. आजपासून लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया या 5 जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. चंद्रपुरात मतदानाला सकाळी 7 पासून सुरुवात झाली आहे. सकाळ पासूनच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केली.

मतदान करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहे. सकाळीच शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी सपत्नीक मतदान केंद्रात येऊन मतदान केलं. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लाख 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लाख 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत.

शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांनी केलं स्वप्तनी केलं मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 75 – वरोरा, 76 – वणी आणि 80 – आर्णि या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राजुरा मतदारसंघात 330 मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात 383 मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात 361 मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात 340 मतदान केंद्र, वणी मतदारसंघात 338 मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात 366 मतदान केंद्र असे एकूण 2118 मतदान केंद्र आहेत.

वंचित चे उमेदवार राजेश बेले यांनी ही मतदान केलं

दरम्यान, उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा, प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही, याकरीता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.