Lok Sabha Election 2024: बिहारचा तिढा सुटला, ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप ठरले

बिहारमध्ये इंडिया आघाडीची भक्कम मोट बांधली गेली आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि इतर घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी 26 जागांवर राजद, तर 9 जागांवर काँग्रेस लढणार आहे. उर्वरित 5 जागा इतर घटकपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. येथे सात टप्प्यात मतदान होणार आहे. 10 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 202 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजद नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांच्यासह काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली.