ईडीने वॉशिंग मशीनमध्ये लपवलेले तीन कोटी केले जप्त

लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने अनेक पंपन्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून आज काही पंपन्यांवर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान ईडीने एका पंपनीच्या वॉशिंग मशीनमधून तब्बल 2 कोटी 54 लाख रुपये हस्तगत केले. अनेक पंपन्या हिंदुस्थानातून मोठय़ा प्रमाणावर पैसे परदेशात पाठवत असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकाने मेसर्स पॅप्रिकोर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला तसेच संजय गोस्वामी यांच्या ठिकाणांवरही छापे घातले. त्याचबरोबर या पंपनीशी संबंधित मेसर्स लक्ष्मीटन मेरीटाइम, मेसर्स हिंदुस्तान इंटरनॅशनल, मेसर्स राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, मेसर्स स्ट्वार्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स भाग्यनगर लिमिटेड, मेसर्स विनायक स्टील्स लिमिटेड, मेसर्स वशिष्ठ पंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि पंपनीचे संचालक भागीदार संदीप गर्ग तसेच विनोद केडिया यांच्या ठिकाणांवरही छापेमारी केली.