काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात येणार; गुजरातमधील टप्प्याचा समारोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ही यात्रेचा गुजरातमधील टप्प्याचा समारोप झाला असून मंगळवारी ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ही यात्रा महाराष्ट्रात येत असल्याने जनतेत याबाबत उत्सुकता आहे.

गुजरातमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सुरत जिल्ह्यातील ‘स्वराज आश्रमा’ला भेट दिली. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना आदरांजली वाहून अभिवादन केले. चार दिवसांत गुजरातमधील सात जिल्ह्यांतून या यात्रेच्या गुजरातमधील टप्प्याचा समारोप झाला. राहुल गांधींनी रविवारी सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील ‘स्वराज आश्रमा’ला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर या यात्रेचा गुजरातमधील टप्प्याचा समारोप करण्यात आला. आता मंगळवारी दुपारी 2 वाजता ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी संमेलनाने महाराष्ट्रातील यात्रेची सुरुवात होणार आहे.