2 मेपासून उन्हाळी सुट्टी; शाळा 15 जूनला सुरू होणार

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाची घोषणा गुरुवारी केली. आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून (शनिवार)पासून सुरू होणार असून उन्हाळी सुट्टी 2 मेपासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरु होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार 2 मे पासून उन्हाळी सुट्टी सुरु होणार आहे.  विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार 15 जून रोजी सुरु करण्यात याव्यात.तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार 1 जुलै पासून सुरु करण्यात याव्यात असे शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.