महुआ मोइत्रा यांनी EDच्या चौकशीला सामोरे जाण्यास दिला नकार, म्हणाल्या…

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांनी आज ED च्या चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. ED ने बुधवारी महुआ आणि दर्शन हिरानंदानी यांना समन्स बजावून गुरुवारी चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले होते. दोघांविरुद्ध फेमा कायदा म्हणजेच परकीय चलन विनियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र महुआ यांनी नकार दिला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ED ला परकीय चलन विनियम कायद्याच्या (फेमा) तरतुदींनुसार महुआ यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवायचे आहेत. महुआ यांच्याविरोधात NRI खात्यात झालेली देवाण घेवाण यांसंबंधित तपास सुरू आहे. याव्यतिरिक्त विदेशात पैसे पाठवण्याबाबत अन्य प्रकरणाचाही तपास सुरू आहे. हा पैसा कुठून आला आणि कोणत्या उद्देशाने हस्तांतरित करण्यात आला यासाठी mahua moitra आणि दर्शन हिरानंदानी यांची चौकशी करायची आहे. महुआ मोइत्राविरुद्धही केंद्रीय तपास यंत्रणाही चौकशी करत आहे. त्यांच्या विरोधाच कॅश फॉर क्वेरी याप्रकरणी तपास सुरू आहे. ईडीने 28 मार्च गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यांनी निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला तर दर्शन हिरानंदानीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला आहे की, महुआ मोइत्रा यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत महुआ मोइत्रा दोषी आढळल्यानं त्यांना निलंबित केले होते. त्यांच्यावर आरोप आहे की, महुआ मोइत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना आपल्या संसदेचा लॉगइन आयडी दिली होती आणि त्यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धी अदानी यांच्याविरोधात प्रश्न विचारले होते. टीएमसीने पुन्हा एकदा महुआ मोइत्रा यांना उमेदवार बनवले आहे. त्या पुन्हा एकदा कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.