मेहबूबा मुफ्ती नजरकैद

जम्मू आणि कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. शनिवारी मुफ्ती यांनी मुफ्ती यांनी घराच्या गेटला लावलेल्या कुलपाचे फोटो पोस्ट करून ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. चार वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट रोजीच जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवत त्याला केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. त्यामुळे या दिवशी पीडीपीचे नेते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.