मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, सोमय्याच्या सेक्स्टॉर्शनची चौकशी सुरू

भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून लोकांना ब्लॅकमेल करणारा भाजपचा पोपट किरीट सोमय्या अश्लील व्हिडीओ प्रकरणात चांगलाच अडचणीत आला आहे. सोमय्याच्या सेक्स स्कॅण्डलच्या तब्बल 35 क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

भाजप नेते-माजी खासदार सोमय्याच्या लैंगिक चाळय़ाच्या आक्षेपार्ह व्हिडीओचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमय्याच्या सेक्स्टॉर्शनचा तपास सुरू केला आहे.

गुन्हे शाखा करणार तपास
सोमय्या सेक्स्टॉर्शन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-10 चे पथक करणार आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ञ आणि सायबर पथकाचीदेखील मदत घेणार आहेत. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मंगळवारी मुंबई पोलिसांना दिले होते.