26 कोटींची रोकड, 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; नाशिकमधील सराफा व्यावसायिकाच्या घरात सापडलं घबाड

नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. ‘सुराणा ज्वेलर्स’ या सराफा व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छापेमारीदरम्यान आयकर विभागाला घबाड साडपले आहे. आयकर विभागाला 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींची बेहिसेबी मालमत्ता आढळून आली आहे. 500 नोटांचे शेकडो बंडल सापडल्याने आयकर विभागाला याची मोजणी करण्यासाठी तब्बल 14 तास लागले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील नामांकित सराफा व्यावसायिक ‘सुराणा ज्वेलर्स’वर आयकर विभागाने छापा टाकला. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदीचे व्यवहार आणि आर्थिक उलाढालीची माहिती दडवल्याच्या संशयावरून हा छापा टाकण्यात आला. छापेमारीदरम्यान आयकर विभागाला कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली. जवळपास 30 तास ही कारवाई सुरू होती.