राष्ट्रीय संत मोरारी बापूंनी परळीत येऊन घेतले ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन

राष्ट्रीय संत तथा रामकथा वाचक मोरारी बापू हे 960 भाविकांसह देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर असून त्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रामकथेसाठी तिरुपती हून ओंढा नागनाथ येथे जात असतांना मोरारी बापू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी ते परळी येथे आले होते.

सोमवारी सकाळी स्पेशल ट्रेन ने मोरारी बाबू परळी येथे दाखल झाल. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत केले. स्वतः गाडी चालवत वैद्यनाथ मंदिरात आले. वैद्यनात मंदिरात श्रींची विधीवत पूजा केली पूजेनंतर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रींची प्रतिमा व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, राजेंद्र सोनी, रतन कोठारी, बाजीराव धर्माधिकारी, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव बाबासाहेब देशमुख, राजेश देशमुख, प्रा.प्रदिप देशमुख, विजयकुमार मेनकूदळे, नंदकिशोर जाजू, अनिल तांदळे, डॉ गुरुप्रसाद देशपांडे, शरद मोहरीर, नागनाथ देशमुख, रघुनाथ देशमुख, अनिल पुजारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लवकरच परळीत रामकथेसाठी येणार- मोरारी बापू

दरम्यान दर्शन करून पुढील प्रवासासाठी रेल्वे गाडीमध्ये बसताना, आपल्याला राम कथेसाठी परळीकरांनी येण्याचे निमंत्रण दिले असून, मी लवकरच कथेसाठी परळीत येणार असल्याची माहिती, स्वतः मोरारी बापू यांनी उपस्थित भाविकांनी दिली.