मालाडमध्ये सापडले नवजात अर्भक  

मालाड पूर्वच्या नवजाला पाडा येथील नाल्याजवळ स्त्राr जातीचे नवजात अर्भक आढळून आले. त्या नवजात अर्भकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मालाड पूर्व येथे नवजाला पाडा आहे. शनिवारी सकाळी एक दक्ष नागरिक तेथून जात होते. तेव्हा त्यांना अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळात दिंडोशी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेतले. ते अर्भक स्त्राr जातीचे असून कपडय़ात गुंडाळून ठेवले होते. पोलिसांनी त्या अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्या अर्भकावर उपचार सुरू आहेत. त्या अर्भकाचा त्याग करणाऱया महिलेविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच मालाड परिसरातील रुग्णालयात जाऊनदेखील पोलीस चौकशी करणार आहेत.

नवजात अर्भक आढळून आल्याच्या घटना

 

z गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अंधेरी रेल्वे फलाट क्रमांक 8 येथे तीन दिवसांचे अर्भक आढळून आले होते z जून 2022 मध्ये खार पश्चिम मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पिलरमध्ये एक दिवसाचे अर्भक आढळून आले होते z सप्टेंबर 2022 मध्ये बोरिवली येथे एका कचराकुंडीत एक दिवसाचे स्त्राr जातीचे अर्भक आढळून आले होते. त्या अर्भकाची एमएचबी पोलिसांनी पालकत्वाची जबाबदारी घेतली होती z ऑक्टोबर 2022 मध्ये कांदिवली पूर्वच्या आकुर्ली रोड मेट्रो इमारतीजवळ एक दिवसाचे नवजात अर्भक आढळले होते.