ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांना एकसारखा पोशाख

हिंदुस्थानी लष्करातील ब्रिगेडियर आणि त्यावरील दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एकाच धाटणीचा नवीन पोशाख तयार करण्यात आला आहे. या एकसारख्या पोशाखामुळे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सामायिक ओळख मिळेल. कर्नल आणि त्यांच्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पोशाख मात्र बदललेले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.