पेटीएमला नवीन यूपीआय आयडी

 

आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवा 15 मार्चपासून ठप्प होत्या. आता पेटीएमने एनपीसीएलकडून परवानगी मिळविली असून ग्राहकांना नवीन पेमेंट सिस्टम प्रोव्हाडरशी जोडण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने यासाठी युजर्सना नोटिफिकेशन पाठविण्यास सुरुवात केली आहे. पेटीएमने यासाठी ऑक्सिस, एचडीएफसी, स्टेट बँक आणि येस बँकेसोबत करार केला असून आता पेटीएमचे ग्राहक या बँकांच्या यूपीआयला वळते केले जाणार आहेत. पूर्वी पेटीएमच्या यूपीआय आयडीपुढे  @paytm असे हँडल जोडले जात होते, ते आता @ptWi, @pthdfc, @ptaxis आणि @ptyes असे मिळणार आहे.