पेटीएम कार्यरत राहील

पेटीएम 29 फेब्रुवारी नंतरही कार्यरत राहील. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी तुम्हाला सलाम करतो, असे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांत 17000 कोटींचे नुकसान

पेटीएमचे शेअर घसरल्याने दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 17 हजार कोटींचे नुकसान झाले.

15,200 जणांची नोकरी जाणार

पेमेंट फर्म पेपाल होल्डिंग्स 2024 मध्ये जवळपास 2500 कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे, असे कंपनीचे सीईओ एलेक्स क्रिस यांनी सांगितले. तर दुसरीकडे युनायटेड पार्सल सर्विक इंक (यूपीएस) नेसुद्धा 12 हजार कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. पेपालने यासंबंधीचा पत्रव्यवहार आपल्या वेबसाईटवर पोस्ट केली आहे. या दोन कंपनीशिवाय सेल्सफोर्स 700 कर्मचारल्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. या नवीन वर्षात हजारो कर्मचाऱयांच्या नोकऱयांवर गंडांतर आले आहे.

बजेटनंतर सेन्सेक्स उसळला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले. बजेटच्या दुसऱया दिवशी बाजार उसळला. आज शुक्रवारी मुंबई शेअर बाजार (बीएसई) निर्देशांक सेन्सेक्स 1400 अंकांनी वधारला होता, परंतु नंतर बाजार बंद होईपर्यंत खाली येऊन 440 अंकाच्या वाढीसोबत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (एनएसई) निर्देशांक निफ्टीसुद्धा 156 अंकांनी वधारला आहे. 21,854 अंकांवर बाजार बंद होईपर्यंत निफ्टी 22,127 अंकांच्या नव्या रेकॉर्डवर पोहोचला होता.