पंतप्रधान मोदींना ‘इंडिया’ची धास्ती, भाजप खासदारांच्या बैठकीत आळवला विरोधकांच्या एकजुटीविरोधात सूर

rahul-gandhi-new

देशात हुकूमशाही पद्धतीने राजकारण करणाऱया मोदी सरकार विरोधात देशभरातील 26  विरोधी पक्षांनी ऐक्याची वज्रमुठ आवळली आहे. इंडिया जिंकणार, भाजप हरणार! असा बुलंद नारा देत इंडिया अर्थात इंडियन नॅशनल डेक्हलपमेंटल इन्क्लुसिक्ह अलायन्सया बॅनरखाली भाजप विरोधक एकवटल्याची धास्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत इंडिया किंवा इंडियन लावल्याने कोणी भारतीय होत नाही, अशी टीका विरोधी पक्षांच्या एकजुटीवर बोलताना केली.

इंडिया नाक लाकलं म्हणून सर्ककाही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेसुद्धा इंडिया नाक लाकलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नाकातही इंडिया आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या नावातही इंडिया आहे, असे सांगत किरोधकांमध्ये एकीचा अभाव असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. 

विरोधकांना टीका करू द्यात, तुम्ही आपले काम चोख करा. जगात हिंदुस्थानचा डंका वाजतो आहे. भविष्यात हिंदुस्थान ही जगातली तिसऱया क्रमाकांची आर्थिक महासत्ता बनेल, जगभरात देशाचा लौकिक वाढतो आहे. मात्र विरोधकांच्या ते पचनी पडत नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू 

तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी, पण आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरमधील परिस्थिती ठीक करण्यासाठी मदत करू आणि प्रत्येक स्त्राr आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही तेथील सर्व लोकांसाठी प्रेम आणि शांती परत आणू. तसेच आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू, असा टोला कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे.