सरकारी संस्था अपयशी ठरल्यास कोर्ट गप्प बसणार नाही

देशाचा कारभार पाहणाऱया कार्यपालन संस्था त्यांचे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्यास कोर्ट हातावर हात ठेवून बसू शकत नाही हे हिंदुस्थानातील न्यायपालिकेने वेळोवेळी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी येथे केले.

वरिष्ठ न्यायालयांकडून सरकारला वेळोवेळी दिले जाणारे निर्देश, सूचना, आदेश यांच्या संदर्भात न्या. गवई यांचे हे मतप्रदर्शन महत्त्वाचे आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये ‘हाऊ ज्युडिशियल रिह्यू शेप्स पॉलिसी’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानादरम्यान त्यांनी हे मतप्रदर्शन केले.