रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरूणीसह एक जण ताब्यात

रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर धाड टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. वेश्याव्यवसाय चालविणाऱ्याला अटक केली आहे. राजेंद्र रमाकांत चव्हाण (45, रा. मिरजोळे जांभूळफाटा, रत्नागिरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भादंवि कलम 370 व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिलेल्या तक्रारीनुसार, राजेंद्र चव्हाण हा बिहार येथील 23 वर्षीय आणि ठाणे येथील 24 वर्षीय तरुणींना येथील एका सदनिकेत या दोन तरुणींचा वापर करुन वेश्याव्यवसाय चालवत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या फ्लॅटवर छापा टाकून दोन तरुणींसह त्याला ताब्यात घेतले.