उकाडा आणखी वाढणार मुंबईकर घामाघूम

गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात उष्णतेने अक्षरशः कहर केला आहे. मुंबईसह ठाणे आणि कोकण किनारपट्टीवरील भागात अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. गुजरात, राजस्थानातून अरबी समुद्रावरून मुंबईच्या दिशेने उष्ण आणि आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे असह्य उकाडा जाणवत असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे वैज्ञानिक डॉ.अनुपम कश्यपी यांनी दिली. पुढच्या 48 तासात तापमान किंचीत कमी होईल. परंतु, उकाडा कायम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

 पारा 36 वर

मुंबईत बहुतांळी भागात आज 35 ते 38 अंश सेल्सियस पायाची नोंद झाली. परंतु,  मुंबईकरांनी अक्षरशः 40 अंश सेल्सिअसचा अनुभव घेतला. सकाळी दहा वाजल्यापासूनच मुंबईकरांचा घामटा निघाला.

पालिका म्हणते काळजी घ्या

पालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये पालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांत उष्माघात बाधित रूग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिकेच्या 14 रूग्णालयात उष्माघात बाधित रूग्णांसाठी शीत कक्ष (कोल्ड रूम) रूग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.

 उकाडय़ावर कूल जोक्सचा शिडकावा

सूर्यनारायण आग ओकत असून तापमानाने चाळिशी ओलांडल्यामुळे मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघालाय. अशातच सध्याच्या उकाडय़ालर क्हायरल होणाऱया कूल मेसेजमुळे चेहऱयाकर हास्याची लकेर उमटतेय.

थोडय़ा केळात घरी पोहोचतोय

आंघोळीसाठी फ्रीजमध्ये पाणी ठेव’,

 बायको मी आज तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवली आहे. ती खाल्ल्यावर तुमचा उकाडा गायब होईल.

नकरा काय केलंस नेमकं..?

बायको भज्या तळल्यात नवरत्न तेलात…थंडा थंडा कूल कूल.’