‘महाशक्तीचा शक्तीपात झालाय, हिंमत असेल तर…’, रोहित पवार यांचा घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यामध्ये बॅकफूटवर गेलेल्या सरकारने आता रडीचा डाव सुरू केला आहे. यामुळे सैरभैर झालेल्या सरकारने भलते सलते उद्योग सुरू केले असून याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. महाशक्तीचा शक्तीपात झाल्याचा घणाघात रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्टद्वारे केला.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकजुटीने लोकसभा निवडणुकीचा सामना करत आहे. महाविकास आघाडीच्या सभांनाही लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अर्जावर आक्षेप घे, नगर-दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्याच नवाचा डमी उमेदवार उभा करणे किंवा सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल कर असले भलते सलते उद्योग सुरू झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

नगरमध्ये भाजपची ‘डमी’ खेळी; मतविभाजनासाठी उभा केला अपक्ष नीलेश लंके

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाशक्तीचा आता शक्तीपात झालाय आणि बळकावलेल्या राष्ट्रवादीच्या तात्पुरत्या घड्याळावरही वाईट वेळ आलीय. त्यामुळंच डॉ. अमोल कोल्हे यांच्या अर्जावर आक्षेप घे… निलेश लंके यांच्याच नावाचा डमी उमेदवार उभा कर.. किंवा शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल कर… असले भलते-सलते उद्योग सुरु आहेत. हिंमत असेल तर असले कपटी डाव खेळण्याऐवजी मैदानात लोकशाही मार्गाने समोरासमोर लढा…. मायबाप जनताच तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.’

खोके सरकारचा रडीचा डाव; साताऱ्यातील पराभवाच्या भीतीने शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल