रशियन लष्कराचे मालवाहू विमान कोसळले, 15 ठार

रशियन लष्करी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रशियन लष्कराते IL-76 हे विमान खाली उतरताना अचानक इंजिनाला आग लागली आणि हे विमान खाली कोसळले. विमान कोसळल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत.

याबाबत द मॉस्को टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेसंदर्भात रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हंटले की, ही आग लष्करी मालवाहू विमानाला लागली आणि मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हा प्रदेशात हे विमान कोसळले. IL-76 हे विमान खाली उतरताना अचानक इंजिनाला आग लागली आणि यानंतर विमान कोसळले. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.