‘सेबी’ या आठवड्यात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार: रिपोर्ट

हिंदुस्थानच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) अदानी समूहाविरुद्ध यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांबाबत अंतिम अहवाल तयार केला आहे. यासंदर्भातील वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

या प्रकरणाशी निगडित सूत्रांनी सांगितलं की ‘सेबी’ या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाकडे अहवाल सोपवण्याची शक्यता आहे.

अदानी समूहाने किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (एमपीएस) नियमांमधील त्रुटींचा गैरवापर करून शेअरच्या किमतींमध्ये फेरफार केला का आणि संबंधित-पक्ष व्यवहार उघड करण्यात तो अयशस्वी झाला का या कारणांशी संबंधित तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं ‘सेबी’ला चौकशी पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी 14 ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती, पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

जानेवारीत हिंडेनबर्ग अहवालात संबंधित-पक्ष व्यवहार आणि MPS नियमांचे आरोप केंद्रस्थानी होते, ज्यामुळे अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलावर लक्षणीय परिणाम झाला.

नियामकाच्या तपासाला MPS-संबंधित बाबींच्या तपासात परदेशातील व्यवहारांच्या गुंतागुंतीमुळे आव्हानांना सामोरं जावं लागलं.