जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा मार्गी लावणार; शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांचा विश्वास 

लोकसभेत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा नेहमीच आत्मीयतेने आणि आक्रमकतेने मांडण्यात आला. केंद्र शासनाने जुन्या पेन्शन योजनेला मंजुरी देण्याबाबत केलेली टाळाटाळ अत्यंत दुर्दैवी आहे. या वेळेला मात्र जुन्या पेन्शनचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात येईल. हा मुद्दा मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी शिक्षकांना दिला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवालय येथे शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अरविंद सावंत यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. यावेळी नवीन शैक्षणिक धोरण, दर्जेदार शिक्षण आणि डिजिटल शिक्षण, देशातील सर्व अभ्यासक्रमामध्ये गणित, सायन्स, इंग्रजी या विषयामध्ये समानता असावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, कोकण विभाग अध्यक्ष जगदीश भगत, राज्य समन्वयक नितीन चौधरी, शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, सरचिटणीस प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, ज्युनिअर कॉलेज राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष अजित चव्हाण, सरचिटणीस मुरलीधर मोरे, कार्याध्यक्ष पैलास गुंजाळ, ज्युनिअर कॉलेज विभाग अध्यक्ष विशाल बावा, सरचिटणीस मंगेश पाटील, कोषाध्यक्ष प्रभाकर भोईटे, विधी सल्लागार मच्छिंद्र खरात, दक्षिण विभाग अध्यक्ष हितेंद्र चौधरी, उत्तर विभाग कोषाध्यक्ष नाना राजगे, विजय घाडगे, सज्जाद मापारी, संतोष नरुटे, केरबा सरक, महिला आघाडी प्रमुख अनुश्री घोगळे,  मुंबईच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहम्मद आलमगीर खान, प्रसारक व प्रचारक प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब घाडगे यांच्यासह शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.