अंबादास दानवे यांनी घेतली प्रिया सिंगची भेट, विचारपूस करत दिला धीर

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्र्वजित याने त्याची प्रेयसी प्रिया सिंग हिला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. सध्या प्रियावर ठाण्यातील इन्फिनिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन प्रिया सिंग हिची विचारपूस केली आणि तिला धीर दिला.

चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

सामनाने प्रियावरील या हल्ल्याला सर्वप्रथम वाचा फोडल्यानंतर ठाणे पोलिसांना जाग आली आणि तब्बल 6 दिवसानंतर ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली.

राज्य महिला आयोगानेही प्रिया सिंग हिच्यावरील हल्ल्याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून चौकशी करून अहवाल मागवला आहे