माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला असून  या गोळीबारात त्यांचा मृत्यू  झाला आहे. त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या नंतर त्यांना उपचारासाठी करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत.

मॉरिस भाई नावाच्या व्यक्तिने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर मॉरिस भाईनेही स्वतःवर चार गोळ्या झाडल्या असून त्याचाही मृत्यू झाला आहे.

शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते पुत्र होते.