टी -20 मध्ये माहीने रचला विक्रम; 300 गडी बाद करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक

IPL 2024 चे धूमशान सध्या सुरू आहेत. आयपीएलमध्ये होणाऱ्या विविध विक्रमांमुळे प्रत्येक सिजन क्रिकेट रसिकांची उत्कंठा वाढवत असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीने म्हणजेच क्रिकेटरसिकांच्या माहीने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-20 क्रिकेटसामन्यांमध्ये 300 गजी बाद करणारा तो पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. आयपीएल 2024 च्या विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात माहीने हा विक्रम करत इतिहास रचला आहे.

IPL 2024 च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जशी यांच्यात सामना झाला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉला झेलबाद केले आणि त्याने हा विक्रमी टप्पा गाठला. टी -20 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 300 गडी बाद करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. दिनेश कार्तिक आणि क्विंटन डी कॉकसारख्या खेळाडूंना मागे टाकत त्याने ही कामगिरी केली. धोनीनंतर या यादीत पाकिस्तानचा कामरान अकमल दुसऱ्या स्थानावर आहे. दिनेश कार्तिक तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक चौथ्या आणि इंग्लंडचा जोस बटलर पाचव्या स्थानावर आहे.