सुजित पाटकर यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

कथित जम्बो कोविड सेंटर  प्रकरणात व्यावसायिक सुजित पाटकर यांना मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

पाटकर यांची चौकशी पूर्ण झाल्याचे ईडीतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पाटकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याचवेळी पाटकर यांच्या आजारपणाचा विचार करून त्यांना तुरुंगात ऑर्थोबेड तसेच आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश आर्थर रोड तुरुंग प्रशासनाला देण्यात आले. पाटकर यांना ईडीने 19 जुलैला अटक केली होती. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली होती. त्या कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी पाटकर यांना न्यायालयात हजर केले होते.