रविवारी कुठे असणार मेगाब्लॉक? वाचा बातमी

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दर रविवार प्रमाणे 7 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकल सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी 11.30 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.52 ते दुपारी 3.55 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी 11.28 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील, माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचतील.

डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.39 वाजता सुटेल.

अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कर्जत लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.44 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 04.44 वाजता पोहोचेल.

पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
(बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाही)
(नेरुळ/बेलापूर-खारकोपर बंदर मार्ग वगळून)

सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बंद राहतील.
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील.

डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी 3.16 वाजता असेल आणि पनवेल येथे 4.36 वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथे सकाळी 10.17 वाजता सुटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.36 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल येथून सुटणारी पहिली लोकल 4.10 वाजता सुटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे संध्याकाळी 5.30 वाजता पोहोचेल.

डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून 4.00 वाजता सुटून पनवेल येथे दुपारी
04.52 वाजता पोहोचेल.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटून ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि पनवेल येथून सुटणारी पहिली लोकल पनवेल येथून सुटल्यानंतर 4.26 वाजता ठाणे येथे संध्याकाळी 5.20 वाजता पोहोचेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.