संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करा, ओबीसी संघर्ष समन्वय समितीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याकडून जगदगुरु संत तुकाराम महाराज, साईबाबा, महात्मा ज्योतीराव फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व इतर महापुरुषांची बदनामी होईल असे वक्तव्य करण्यात आले आहे. देशाच्या तिरंगा राष्ट्रध्वजाबददल तसेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीबाबतही अपमानकारक जाहीर वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी राष्ट्रद्रोह आणि देशद्रोहाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष समन्वय समितीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज रत्नागिरीतूनही निषेध व्यक्त करण्यात आला. आज ओबीसी संघर्ष समन्वय समितीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, मिलींद नार्वेकर, दिपक सुर्वे, शांताराम मालप, रवींद्र मांडवकर, कुमार शेट्ये, बशीर मुर्तझा, राजन सुर्वे, हरिश्चंद्र गोरिवले, शांताराम खापरे, प्रदीप कांबळे, रुपेश चवंडे, विलास तोडणकर, भास्कर आंबेकर, मनिषा बामणे, साक्षी रावणंग, कासम