Video – तालिबानच्या बड्या नेत्याचे समलिंगी संबंध, सुरक्षारक्षकासोबतची पलंगदृश्ये कॅमेऱ्यात कैद

महिलांवर तऱ्हेतऱ्हेचे निर्बंध लादणाऱ्या आणि समलिंगी संबंधांना गुन्हेगारी कृत्य घोषित करणाऱ्या तालिबानच्या एका ज्येष्ठ नेत्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या धक्कादायक व्हिडिओमध्ये, तालिबानचा उपप्रमुख असलेला आणि काबुलमधील दा अफगाणिस्तान ब्रेश्ना शेरकत (DABS) चा प्रमुख मुल्ला अहमद अखुंद याने त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवल्याचे दिसून आले आहे. या व्हिडीओला आवाज नाहीये मात्र यामध्ये मुल्ला त्याच्या तरुण सुरक्षा रक्षकासोबत शैय्यासोबत करत असल्याचं दिसून आलं आहे.

शोधपत्रकार असलेल्या अॅमी मेक यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अफगाणिस्तानात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये मुल्ला अहमद अखुंद यांच्यासोबत झोपलेला तरुण हा त्याचा अंगरक्षक आहे. अफगाणिस्तान इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार हा तरुण 21 वर्षांचा असल्याचे सांगितले आहे. या तरुणाने ब्रेस्ना शेरकटमध्ये मुल्लासोबत. या गटाचे उपसंरक्षण मंत्री मुल्ला फाजील यांच्यासोबतही हा तरुण दिसला होता

हा व्हिडीओ समोर आल्यापासून तालिबानचे नेतृत्व आणि त्यांचे वर्तन याबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहे. कारण तालिबानने समलिंगी संबंध हा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे. अफगाणिस्तानात कोणाचे समलिंगी संबंध असल्याचे कळाल्यास त्या व्यक्तीला तुरुंगवास होतो किंवा ठार मारून टाकले जाते. त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तालिबानमध्ये चिंता पसरली आहे.

X (ट्विटर) वापरणाऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, अफगाणिस्तानात लहान मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवले जातात. बच्चाबाजी ही तिथली प्रथाच बनली आहे. मदरश्यातील 9 वर्षांच्या मुलांना वासनेची भूक क्षमवण्यासाठी तालिबानी नेते वापर करतात. तालिबान्यांना दाढी, मिशा नसलेली मुलं आवडतात. दुसर्‍या एकाने लिहिले आहे की, “तालिबानी संस्कृतीत तुम्ही समलिंगी असाल तर ते तुम्हाला फाशी देतात, तालिबानी नेता तरुणांसोबत सेक्स करू शकतो, हे घृणास्पद आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हे तेच लोक आहेत जे म्हणतात की इस्लाममध्ये समलैंगिकता हराम आहे आणि त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे.” सोशल मीडियावर हा गदारोळ माजलेला असताना तालिबानमात्र मुल्लाच्या कृतींकडे दुर्लक्ष करत आहे. मुल्लाला त्याचे काम पुढेही सुरू ठेवण्यास सांगितले असून त्याला कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही.

वासनांध तालिबानी ‘त्या’ पुरुषांच्या शोधात

अमेरिकेने अफगाणिस्तानातून बोऱ्या बिस्तरा गुंडाळल्यानंतर तालिबानने तिथे आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तालिबानी राजवटीमुळे तिथली लोकं जबरदस्त घाबरली आहेत. आपण पूर्वीसारखे नसून आपण बदललो आहोत, हे सांगण्याचा तालिबानने प्रयत्न केला, मात्र त्यांच्या दहशतवाद्यांनी तालिबानच्या दाव्यांना हरताळ फासत आपले क्रूर आणि हिंसक उद्योग सुरूच ठेवले आहेत. महिलांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्याचेही तालिबानने जाहीर केले होते, मात्र तसे घडताना अद्याप दिसलेले नाहीये. अफगाणिस्तानातील महिला घाबरलेल्या आहेत, मात्र त्यांच्यासोबत काही पुरुषही घाबरले आहेत.

डेली मेलने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका समलिंगी पुरुषावर बलात्कार करून त्याला बेदम मारहाण केली. या माणसाला दोन दहशतवाद्यांनी आपण मैत्री करूया असं सांगून बोलावलं होतं. या दोघांनी त्याला काबूलमध्ये लवपण्याचं आमीषही दाखवलं होतं. कालांतराने तुला देशाबाहेर पाठवण्याचीही व्यवस्था करू असंही त्याला सांगितलं होतं. या दोघांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून समलिंगी तरुण त्यांना भेटायला गेला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्यावर बलात्कार केला आणि बेदम मारहाणही केली. या दहशतवाद्यांनी समलिंगी पुरुषाकडून त्याच्या वडिलांचा नंबरही घेतला. तुमचा मुलगा समलिंगी आहे हे सांगण्यासाठी त्यांनी हा नंबर घेतला असं डेली मेलच्या बातमीत म्हटलंय.

आर्टेमिस अकबरी हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. अकबरी हे सध्या तुर्कस्थानात राहतात. आपण पीडित पुरुषाच्या संपर्कात होतो असं त्यांनी सांगितलं आहे. तालिबानी राजवटीत समलिंगी पुरुषांची काय हालत होणार आहे हे या घटनेवरून कळतंय असं अकबरी म्हणालेत. आम्ही बदललोय असा दावा करणारे ताबिलानी खोटारडे असून ते अजिबात बदललेले नाहीत असं अकबरी यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानचे समलिंगी लेखक नेमत सदात यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की तालिबान समलिंगी व्यक्तींना शोधून शोधून ठार मारतंय.