अनोखी संघर्षगाथा, ‘अकेली’मध्ये नुसरतची दमदार भूमिका

अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्या ‘अकेली’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये बंदुकधारींच्या तावडीत सापडलेली नुसरत आणि अन्य महिला दिसत आहेत. युद्धभूमीत अडकलेल्या हिंदुस्थानी तरुणीची ही कथा असल्याचे समजते. ‘जगणं ही तिची लढाई आहे…ती येतेय’ असे म्हणत टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेरसिकांची  उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

‘अकेली’ विषयी नुसरत भरुचा म्हणाली, ‘अकेली’चा अनुभव माझ्यासाठी जबरदस्त होता. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळा. एका मुलीच्या अनोख्या संघर्षाची ही गाथा आहे. ही भूमिका म्हणजे भावनिकदृष्टय़ा थकवणारी अशी अत्यंत आव्हानात्मक होती.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणय मेश्राम म्हणाले, अखेर टीझर आला आहे. कुटुंबाचं प्रेम आणि सुरक्षेसाठी शूरवीरपणे लढा देणाऱया प्रत्येक महिलेचा हा चित्रपट आहे. प्रत्येकजण त्याच्याशी जोडला जाईल. ‘अकेली’ हा चित्रपट दशमी स्टुडिओजची निर्मिती आहे.