पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या निकषात यूजीसीकडून बदल

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या निकषात मोठे बदल केले आहेत. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG देखील उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या आशयाचे पत्र यूजीसीने सर्व राज्य शिक्षण मंडळांना पाठवले आहे.

देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना त्यांच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना CUET UG 2024 बद्दल जागरूक करावे लागेल. देशभरातील विद्यापीठे CUET UG मेरिटच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसह पदवीपूर्व प्रवेशासाठी CUET UG 2024 चा ऑनलाइन अर्ज भरावा लागनार आहे. पदवीपूर्व प्रवेशाचे नियम विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व राज्य शिक्षण मंडळांनी CUET UGची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. CUET UG 2024 साठी उमेदवार 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, असे पत्र यूजीसीचे  सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांच्या वतीने राज्य शिक्षण मंडळांना पाठवण्यात आले आहे.