जगाच्या पाठीवर – हिंदुस्थानातील जास्त लोकसंख्येचे गाव

>>प्राजक्ता गोखले

हिंदुस्थानची लोकसंख्या 140 करोडच्या आसपास आहे. प्रत्येक गाव, शहर गर्दीने भरलेले दिसते. खेडी ओस पडून सगळा लोक शहरांकडे जात आहे असे चित्र वाटते, पण हिंदुस्थानात असे एक गाव आहे, ज्या गावाची लोकसंख्या हिंदुस्थानात सगळय़ात जास्त आहे.

हे गाव आहे पश्चिम बंगालमध्ये मालदा जिल्हय़ात. या गावाचे नाव आहे बैरामपूर. या गावाची लोकसंख्या 30 हजार इतकी आहे. हे गाव बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. हे गाव हिरव्यागार वनराईने वेढलेले आहे. शेती हा या गावाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोलकाता शहरापासून 360 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात वेगवेगळय़ा जाती, धर्मांचे लोक राहतात.

या गावातील जमीन अतिशय सुपीक असल्यामुळे तिथे उत्तम शेती होते. त्यामुळेच कदाचित या गावातील लोकांना शहरात जाण्याची गरज भासत नसावी.