मैत्रीच्या सुखद आठवणींचा ‘मुसाफिरा’

आगामी ‘मुसाफिरा’ या मराठी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच लाँच झाले. मैत्रीवर आधारित हे गाणे गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे.

 तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. मैत्रीचे नाते हे नेहमीच खास असते. एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्या असतात, अगदी भांडणेही. मैत्रीच्या या अशाच सुखद आठवणींना उजाळा देणारे आणि दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे हे गाणे आहे. यात धमाल, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना आहेत. रोहन-रोहन यांचे संगीत लाभले असून हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे.  मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल.