Live – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोबीने निवडणुका घ्या!

  • सरकारमध्ये हिम्मत असेल तर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी त्यांनी करावी
  • गुंडांमध्ये एवढी मस्ती कुठून आली, काही झाले तरी आमचे काहीच बिघडत नाही ही गॅरेंटी त्यांना कोणी दिली ?
  • गुंड कोणाच्याही पक्षात असो त्यांना राजाश्रय मिळता कामा नये
  • मॉरीस आत्महत्या करतानाचे फुटेज आहे का ?
  • ही निवडणूक हुकूमशाही विरूद्ध लोकशाही अशी आहे
  • कोश्यारी मॉरीसचा सत्कार करत असताना  त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांचे या सगळ्याशी काही धागेदोरे आहेत का ते देखील तपासा
  • खून केल्यानंतर आत्महत्या का झाली ? नेमकं यात काय काळंबेरं आहे ?
  • मुडदेफरासांना फासावर लटकवा आणि लोकशाही वाचवा
  • गायकवाडांनी म्हटले की मिंधेंकडे त्यांचे करोडो रुपये आहेत, तिथे ईडी जाणार आहे की नाही ?
  • गणपत गायकवाडांवर गोळीबार करण्याची वेळ का आली ?
  • न्यायासाठी लढणाऱ्यांचे संरक्षण काढून गुंडांना संरक्षण दिले जात आहे
  • खरंच गोळी मॉरीसने चालवली? का कोणाला सुपारी देऊन मॉरीस आणि अभिषेक घोसाळकरांची हत्या घडवून आणली याचा खुलासा झाला पाहिजे
  • एक वेगळा विषाणू आपल्या मतांमुळे फोफावतो आहे, यांना मते न देणे हा यावरचा उपचार आहे
  • आपले पुढचे भवितव्य आपण गुंडांच्या हाती देणार आहात का ?
  • माझी तळमळ सर्वोच्च न्यायालय पाहील आणि आम्हाला न्याय देईल
  • जनतेला, लोकशाहीला वाचवा
  • सर्वोच्च न्यायालयच आता शेवटचा आशेचा किरण आहे
  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोबीने निवडणुका घ्या
  • सरकारच्या बरखास्तीची आम्ही मागणी करत आहेत
  • मुळात राज्यपाल पद यापुढे ठेवावे अथवा नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे
  • म्हणून आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही कारण त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही
  • सरकारच गुंडांच्या मागे उभे राहिले तर खून-खराबे वाढत राहतील
  • पोलिसांना मोकळा हात दिला तर सगळे गुंड 24 तासांत तुरुंगात टाकू शकतील
  • हत्या होत असताना त्याची तुलना तुम्ही श्वानासोबत करता ?
  • निर्ढावलेला, निर्घृण मनाचा, निर्दयी मनाचा हा गृहमंत्री आहे
  • संस्कृत शब्द वापरले म्हणजे सुसंस्कृत होत नाही
  • फडणवीसांची प्रतिक्रिया संतापजनक होती
  • आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशी फडणवीसांची कालची प्रतिक्रिया होती
  • पोलीस महासंचालकांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे
  • काल पुण्यात असीम सरोदे, निखील वागळे, विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला
  • गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत एका आमदाराने गोळीबार केला
  • पूर्वीच्या राज्यपालांसोबतच गुंडाचा फोटो आहे
  • पूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जास्तच कर्तव्यदक्ष होते
  • आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात