उद्धव ठाकरे यांचा रविवारपासून दोन दिवसांचा झंझावाती कोकण दौरा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेसाठी दि. 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात हा दौरा होणार आहे.

दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 45 मिनीटांनी सावंतवाडी येथील गांधीचौक येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर कुडाळ येथील जिजामाता चौक येथे ते जनसंवाद यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजून 50 मिनिटांनी मालवण बंदर जेटी येथे त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते किल्ले सिंधुदुर्ग येथे प्रयाण करतील. यावेळी ते नागरीकांशी संवाद साधणार आहे. सायंकाळी 5 वाजता आंगणेवाडी येथे श्रीभराडीदेवीचे दर्शन घेणार आहेत.

दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राजापूर तालुक्यातील जवाहर चौकात शिवसैनिकांसमवेत संवाद साधणार आहेत. त्यानंतर 11 वाजून 45 मिनिटांनी श्रीदेव धुतपापेश्वर मंदिर येथे दर्शन घेणार आहेत आणि मंदिर बांधकामाची पाहणी करणार आहेत. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालय येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी संगमेश्वर येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत