साथियनचा शरतवर विजय; दबंग दिल्ली टीटीसी आणि चेन्नई लायन्स यांची उपांत्य फेरीत धडक

महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये साथियन ज्ञानसेकरन याने अनुभवी अचंता शरत कमलवर दणदणीत विजय मिळवला. दबंग दिल्ली टीटीसीने 9-6 अशा फरकाने गतविजेत्या चेन्नई लायन्सचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्ली फ्रँचायझीने 42 गुणांसह अंतिम 4 संघांमध्ये आपली जागा पक्की केली, तर चेन्नई लायन्सनेही 41 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

हिंदुस्थानी टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित अल्टिमेट टेबल टेनिस लीगला प्रोत्साहन दिले आहे. 2017 पासून सुरू झालेली लीग हिंदुस्थानातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे. साथियनने 3-0 अशा फरकाने शरतचा पराभव करून आपल्या फ्रँचायझीला आघाडी मिळवून दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू प्रत्येक गुण मिळवण्यासाठी आपला अनुभव पणाला लावताना दिसले. दबंग दिल्ली टीटीसीच्या खेळाडूने चुरशीची टक्कर देताना पहिला गेम गोल्डन गुणाने जिंकला.

दाफा न्यूजनुसार, समर्थित इंडियन ऑइल टेबल टेनिस सीझन 4 चे सर्व सामने स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमावर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून प्रसारित होत आहेत आणि बुकमाय शो वर तिकिट्स उपलब्ध आहेत.