कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बांदा येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर 62 गुन्हे दाखल आहेत. अन्सारी याच्या मृत्युनंतर उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अन्सारी याची तब्येत सोमवारी रात्री अचानत तब्येत बिघडली आणि तुरुंग प्रशासनात एकच गोंधळ उडाला. अन्सारी याच्या ओटीपोटात दुखत असल्याने त्याला तत्काळ राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

सोमवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मुख्तार अन्सारीची अचानक तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. मुख्तारने त्याला जीवे मारण्याचा तसेच त्याच्या जेवणात स्लो पॉयझन दिले जात असल्याचा आरोप केला होता. मागच्या वेळेला मुख्तार अन्सारी याच्या सुरक्षेत केलेल्या हलगर्जीपणा तुरुंग अधिकाऱ्यासह तुरुंग उपाधिकाऱ्याचेही निलंबन करण्यात आले होते.