उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अदानी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेतर्फे स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा येथील स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या गरजू लोकांना ब्लँकेट वाटप विद्युत कामगार सेनेचे सरचिटणीस नरेंद्र पालांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुकेश भाटकर, विठ्ठल शेळके, उत्तम जाधव, राजू उम्रसकर उपस्थित होते.

धारावी विधानसभा शाखा क्रमांक 184 चे शाखा संघटक दत्ता मोरे, शाखाप्रमुख आनंद भोसले यांच्यातर्फे धारावी नारायण शेडगे पटांगण येथे दहावी, बारावी विद्यार्थ्यांना कॉलेज बॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विभाग क्रमांक 10 चे विभागप्रमुख महेश सावंत, धारावी विधानसभेचे विधानसभा संघटक विठ्ठल पवार, विधानसभा समन्वय राजेंद्र सूर्यवंशी, उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर, महादेव शिंदे, माजी नगरसेवक वसंत नकाशे, उपविभाग समन्वयक जावेद खान, धारावी महिला विधानसभा संघटक कविता जाधव, धारावी विधानसभा समन्वयक माया जाधव, शाखा संघटक अनिता पोटे, शाखा समन्वयक मनीषा तरपे आदी उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा क्रमांक 5 च्या वतीने प्रभागातील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, माजी नगरसेवक संजय घाडी, शाखाप्रमुख संदीप शेलार, महिला शाखा संघटक पूजा गावडे, शाखा समन्वयक प्रतिभा अफंडकर, कार्यालय प्रमुख रामचंद्र नायक, उपशाखाप्रमुख मनोहर जाधव, नीलेश राणे, दीपक कराडे, नितेश माने, सुषमा सरफरे, पौर्णिमा सावंत, प्रिया वराडकर आदी उपस्थित होते.

शाखा क्रमांक 118 व दिशा वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने कन्नमवार नगर येथे नेत्रचिकित्सा शिबीर घेण्यात आले. यावेळी आमदार सुनील राऊत, माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी, माजी नगरसेवक उकेंद्र सावंत, उपविभागप्रमुख शेखर जाधव, रश्मी पहुडकर, परम यादव, शंकर ढमाले, शाखाप्रमुख अभय राणे, महिला शाखा संघटक प्रिया गावडे, दिशा ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी, शरद रावले, सुरेश पांचाळ, दर्शना राणे, शर्मिला परब उपस्थित होते.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वरळी विधानसभा यांच्या वतीने वरळी येथील आनंद निकेतन आश्रम येथे सर्व ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, कक्षाचे महाराष्ट्र सचिव निखिल सावंत, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कक्ष विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे यांनी केले. तसेच कक्ष कार्यालय चिटणीस राजेश चव्हाण, उपसंघटक विजय पवार, सुजित नलावडे, कक्ष प्रसारक सुशील वर्मा, कक्ष वॉर्ड संघटक महादेव शिवलकर, अजिंक्य नलावडे, रामचंद्र विमुला, संतोष हिनुकले, संकेत वरळीकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

बालतरुण विकास मित्र मंडळ व अजित प्रतिष्ठानतर्फे मोफत वह्यावाटप, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पेन व पह्ल्डर वाटप भारतीय कामगार सेना चिटणीस हरी शास्त्राr यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर, शाखाप्रमुख उदय दळवी, युवा शाखा अधिकारी गौतम खांबे, आकाशदीप क्लासेसचे संस्थापक राहुल वाडेकर, मंडळाचे पदाधिकारी विजय रेडकर, सुधीर ब्रीद, राजेश रहाटे, संजय घुमे, प्रकाश साळवी, गणेश लोके, चंद्रकांत धामणे, रूपेश पांचाळ, आयोजक अजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपशाखाप्रमुख आनंद ओटवकर उपस्थित होते.