विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा आज मिटला. काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात आले आहे.

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त होते. बरोबरच अजित पवारांबरोबर अनेक आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ सर्वात जास्त बनले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या वाटय़ाला आले. त्यातही त्या पदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू होती. वडेट्टीवार यांच्याबरोबरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनीही जोर लावला होता. अखेर आज वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.