मिंधे-अजित पवार गट आणि भाजपकडून आचारसंहितेचं उल्लंघन; निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

शिंदे गट आणि भाजपकडून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने पक्षाला पत्र पाठवत शिंदे गट आणि भाजपकडून आचारसिंहेतेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाने सजगतेने केलेल्या तक्रारीचे निवडणूक आयोगाने कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेतल्याबाबत पक्षाने आयोगाचे आभारही मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल केलेल्या आमच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगाचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. आमच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाने इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्याचे नमूद करत शिंदे गटाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिंदे गटाला त्यांच्या यादीतील नेते हे त्यांच्याच पक्षाचे सदस्य असल्याचे प्रमाणित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यात अनेक भाजप नेत्यांची तसेच अजित पवार गटातील नेत्यांची देखील नावे आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ अंतर्गत स्टार प्रचारकांची कोणतीही यादी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही अशी नोंद आहे, परिणामी त्यांना किमान पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी प्रवास खर्चाच्या सवलतीस नकार दिला गेला आहे. आमच्याकडून सजगतेने करण्यात आलेल्या तक्रारीचे कौतुक केल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखल्याबद्दल निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक आभार!

निवडणूक आयागाने या तक्रारीची दखल घेत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखल्याबाबत आयोगाचे आभार मानले आहेत.